Advertisement

'पीसीओएस'च्या जागरूकतेसाठी अभिनेत्री श्रुती हसनचा पुढाकार

अभिनेत्री श्रुती हसनने पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) रोगाने पीडित महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ओझीवा या भारतातील क्लीन-प्लांट बेस्ड न्यूट्रिशन ब्रॅंडद्वारे राबविण्यात आलेल्या 'मायपीसीओएसस्टोरी' या मोहिमेला आपला पाठिंबा दर्शविला आहे.

'पीसीओएस'च्या जागरूकतेसाठी अभिनेत्री श्रुती हसनचा पुढाकार
SHARES

अभिनेत्री श्रुती हसनने पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) रोगाने पीडित महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ओझीवा या भारतातील क्लीन-प्लांट बेस्ड न्यूट्रिशन ब्रॅंडद्वारे राबविण्यात आलेल्या 'मायपीसीओएसस्टोरी' या मोहिमेला आपला पाठिंबा दर्शविला आहे. या मोहिमेचा उद्देश या रोगाने पीडित महिलांना त्यांचे अनुभव सांगण्यासाठी उद्युक्त करून एक असा समुदाय तयार करणे, ज्यात सर्वजण एकमेकांना सल्ला आणि माहिती देऊन सक्षम करतील.  

श्रुती हसन म्हणाली, “महिलांनी खुलेपणाने बोलणे आणि पीसीओएस व त्यासंबंधी मुद्द्यांवर मोकळे बोलण्याचा हा सर्वात महत्त्वाचा काळ आहे. याविषयी जागरूकता कमी आणि यासंबंधीचे भ्रम जास्त आहेत. त्यामुळे महिला या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक समर्थन आणि मार्गदर्शन मिळवण्यात अडचणींना सामो-या जातात. ओझिवा #मायपीसीओएसस्टोरी पीसीओएसशी झुंजणा-या महिलांसाठी एक प्लॅटफॉर्म बनवण्याच्या दिशेने एक अद्भुत चळवळ आहे. यावर खुलेपणाने चर्चा केल्याने आपण ही स्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकू.”

पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) एक हार्मोनल विकार असून तो प्रजनन वयातील महिलांमध्ये सर्वसामान्य आहे. एवढेच नाही तर, दर पाच महिलांपैकी एक महिला पीसीओएस आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे अनियमित मासिक पाळी, गर्भधारणेत काठीण्य, शरीराचे वजन वाढणे, मुरूम किंवा चेह-यावरील केसांसह अंडाशयात अल्सर होऊ शकतो. या आरोग्यविषयक समस्या लक्षात घेता, ओझिवा चळवळीच्या २०२० आवृत्तीत जास्तीत जास्त रुची वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. ही मुव्हमेंट आता वाढत्या सोशल मीडिया यूझर-बेसपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. येथे दररोज महिलांचा सहभाग आणि चर्चा वाढत आहे.

ओझिवाच्या सह संस्थापक आरती गिल यांनी चळवळीविषयी म्हणाल्या की, “ आज भारत आणि जगभरात पीसीओएस हा एक सामान्य सिंड्रोम असला तरीही या स्थितीविषयी जागरूकतेचा गंभीर अभाव आहे. यातून अनेक भ्रम निर्माण होतात. सप्टेंबर हा पीसीओएस अवेअरनेस महिना आहे. हार्मोनल अंसतुलन आणि प्रजनन आरोग्यासंबंधी मुद्दे नेहमीच सामान्य चर्चेमध्ये समाविष्ट केले जात नाहीत. कारण अजूनही समाजाच्या एका मोठ्या गटात यावर मोकळेपणाने चर्चा केली जात नाही. त्यामुळे न्यूट्रिशन ब्रँड पीसीओएसविषयी जागरूकतेचा प्रसार करण्यात सक्रियतेने रूची घेत आहे. कारण हा एक सामान्य विकार आहे. महिलांना आपल्या आरोग्याची अधिक चांगली देखभाल करणे आणि लक्षणांचे व्यवस्थापन करण्यासाठी उचलल्या जाणा-या निवारक पावलांविषयी अधिक माहिती असली पाहिजे. या कँपेनमागे आमचा उद्देश हा आहे की, पीसीओएसचा मुद्दा दाबण्याऐवजी तो धारणेत बदलणे, कारण आजारग्रस्त महिलांमधील जटिलता आणखी घातक ठरू शकतात.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा