आदर्शचे धमाल मस्ती गीत

 Mumbai
आदर्शचे धमाल मस्ती गीत
आदर्शचे धमाल मस्ती गीत
See all

मुंबई - मराठी चित्रपट संगीतात अनेक नवीन प्रयोग होत असून ते प्रेक्षकांच्या पसंतीसही पडले आहे. याच पार्श्वभूमीवर ‘ओढ द अट्रॅक्शन’ या आगामी मराठी चित्रपटात वेगळ्या शैलीतील संगीत ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटातील एक धमाल युथ साँग गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं. ‘सोनाली एंटरटेन्मेंट हाऊस’ निर्मित, ‘जी. एस. फिल्मस् अकादमी प्रोडक्शन’ प्रस्तुत ‘ओढ’ चित्रपटाची निर्मिती एस. आर. तोवर यांनी केली आहे. तर दिग्दर्शन दिनेश ठाकूर यांचं आहे. ‘अंगात नखरा डोळ्यात मस्ती, चल प्रेमाची खेळूया कुस्ती’ असे बोल असणाऱ्या कौतुक शिरोडकर लिखित या गीताला संगीतकार प्रवीण कुंवर यांनी सुरेल संगीताची साथ दिली आहे.
धमाल मस्तीच्या अंदाजातलं हे गाणं गायला मिळाल्याबद्दल आदर्श शिंदे यांनी ‘ओढ’चे संगीतकार, दिग्दर्शक आणि निर्माते यांचे विशेष आभार मानले. डीजेवर ताल धरायला लावणारं हे गीत प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल असा विश्वास आदर्श शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला. कॉलेज गॅदरिंगच्या जल्लोषपूर्ण वातावरणात हे गीत लवकरच चित्रीत करण्यात येणार आहे.

Loading Comments