आदित्य नारायण संदर्भात 'तिचा' खुलासा!


SHARE

बॉलिवूड गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण एका व्हिडिओमुळे चांगलाच प्रकाशझोतात आला आहे. या व्हिडिओत आदित्य इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत असल्याचे दिसत आहे. आदित्यनं जरी सर्व प्रकरणावर माफी मागितली असली, तरी त्याच्या या उद्धटपणाचा नेटिझन्सनी चांगलाच समाचार घेतला. काहींनी आदित्यची बाजू घेतली, तर काहींनी त्याच्यावर टीका केली आहे.
आता या प्रकरणाला आणखी एक वेगळे वळण आले आहे. आदित्यच्या कॉलेजमधील एका विद्यार्थिनीनं जुना किस्सा सांगत एका प्रकरणाचा खुलासा केला आहेमिठीबाई कॉलेजमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थिनीनं इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करतानाच व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओवर तिने ट्वीट केलं की, 'मला आठवत आहे, कॉलेजमध्ये सुरक्षा रक्षकांशी गैरवर्तन केल्याने त्याला एका आठवड्यासाठी कॉलेजमधून निलंबित केलं होतं. जुन्या सवयी लवकर बदलत नाहीत.आदित्यला निलंबित केल्याची नोटीस कॉलेजच्या नोटीसबोर्डवर लावण्यात आल्याचं देखील तिने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.  हेही वाचा

कंगनाची बहीण ऋतिकला म्हणते 'अंकल' !


संबंधित विषय