Advertisement

आदित्य नारायणची एअरलाइन्स कर्मचाऱ्याला शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल


आदित्य नारायणची एअरलाइन्स कर्मचाऱ्याला शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल
SHARES

बॉलिवूड गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. या व्हिडिओमध्ये आदित्य एका विमानतळावर एका एअरलाइन्स कर्मचाऱ्याला शिवीगाळ करताना दिसत आहे. त्याचे झाले असे की, आदित्य ठरावीक वजनापेक्षा जास्त सामान घेऊन जात होता. त्यामुळे विमानतळावर कर्मचाऱ्याने त्याची अडवणूक केली. अधिक सामानासाठी त्याला पैसे देण्यास सांगितले. यावर आदित्यचा पारा चढला आणि तो त्या अधिकाऱ्याला ओरडू लागला. हा व्हिडिओ राजपूर एअरपोर्टचा असल्याचे बोलले जात आहे. पण यासर्व प्रकरणानंतर आदित्य नारायणने माफी मागितली आहे. 



"इथे सगळे उभे आहेत पण तू मुद्दामून मलाच विचारलेस. मी फक्त माझ्या मित्रांसोबत व्हिडिओ काढत होतो,” असे आदित्य त्याच्या अंगावर ओरडून बोलत होता. यावर कर्मचारी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होता. "तुम्ही माझ्याशी अशा भाषेत बोलू शकत नाही,” हे सुद्धा कर्मचारी त्याला बोलला. यावर आदित्य बोलला की, "मी जे पाहिजे ते बोलू शकतो.” "मुंबई तो में पोहचुंगा. फिर देख. तेरी चड्डी नही उतारी तो मेरा नाम आदित्य नारायण नाही,”अशी धमकी देखील आदित्यने कर्मचाऱ्याला दिली. आदित्यने जरी याप्रकरणी माफी मागितली असली तरी अनेकांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. 




आदित्य नारायण हा उदित नारायण यांचा मुलगा आहे. या घटनेनंतर सगळ्यांना त्याच्या वडिलांनी गायलेले एक गाणे नक्कीच आठवले असेल आणि ते म्हणजे पापा कहते हैं, बड़ा नाम करेगा... बेटा हमारा ऐसा काम करेगा. पण आदित्यने याच्या अगदी उलटेच केले आहे. त्यामुळे उदित नारायण यांच्या अपेक्षांचा नक्कीच भंग झाला असावा.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा