कपिल शर्माही लग्नाच्या बेडीत अडकणार


कपिल शर्माही लग्नाच्या बेडीत अडकणार
SHARES

बॉलिवूडचे हॉट कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी लग्नाची घोषणा केल्यानंतर अाता विनोदवीर कपिल शर्मा यानेही लग्न करणार असल्याचं जाहीर केलं आहे. कपिल शर्मा हा त्याची गर्लफ्रेंड गिन्नी चतरथ हिच्यासोबत १२ डिसेंबरला जालंधर येथे लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.


काय म्हणाला कपिल?

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, कपिलने आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली. यावेळी कपिल म्हणाला, गिन्नी चतरथ ही मूळची जालंधरची असल्याने आपण १२ डिसेंबरला जालंधरमध्येच लग्न करणार आहोत.

कपिलला अत्यंत साध्यापणाने लग्न उरकायचं होतं. मात्र गिन्नी ही तिच्या आई-वडिलांचं एकुलतं एक अपत्य आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबियांना मोठ्या थाटामाटात लग्न करायची इच्छा आहे. त्याच्या आईचीही तीच इच्छा असल्याने त्यांचं मान राखत लग्न धूम-धडाक्यातच करणार असल्याचं कपिलनं म्हटलं आहे.


कपिल करणार वापसी

मागील अनेक दिवसांपासून छोट्या पडद्यापासून लांब राहिलेला कपिल पुन्हा एकदा धडाक्यात पदार्पण करणार आहे. नुकतंच कपिलने ट्विटरच्या माध्यमातून टीव्हीवर पुन्हा एकदा 'द कपिल शर्मा शो'चा दुसरा सीझन सुरू होणार असल्याचं सांगितलं. त्याचा 'द कपिल शर्मा शो' हा कॉमेडी शो दिवाळीला ऑन एयर करण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.

रणवीर सिंह, दीपिका पादुकोण या जोडीसह कपिलने आपल्या लग्नाची घोषणा केल्यानंतर आता देसी गर्ल प्रियंका चोपडा आणि निक जोनस यांच्या लग्नाची तारीख जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक दिसत आहेत.

संबंधित विषय