Advertisement

सिद्धार्थ शुक्लाची शेवटची पोस्ट व्हायरल, 'धन्यवाद' म्हणत...

सिद्धार्थ शुक्लाची शेवटची पोस्ट सध्या वायरल होतेय. त्यात तो म्हणाला की...

सिद्धार्थ शुक्लाची शेवटची पोस्ट व्हायरल, 'धन्यवाद' म्हणत...
SHARES

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) चं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची बातमी समोर आली. या बातमीचा सगळ्यांनाच धक्का बसला. अनेक जण त्याच्या निधनावर हळहळ व्यक्त करत आहेत. यासोबतच सिद्धार्थ शुक्लाची शेवटची पोस्ट सध्या वायरल होतेय.

सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) नं २४ ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट केली होती. आपला एक फोटो शेअर करत त्यानं सर्व फ्रंटलाइन वर्कर्सचे आभार मानले होते. सिद्धार्थ शुक्लानं लिहिलं होतं की, “सर्व फ्रंटलाइन वर्कर्सचे मनापासून आभार! तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालता, अगणित तास काम करता आणि जे रुग्ण त्यांच्या कुटुंबियांसोबत राहू शकत नाहीत त्यांना दिलासा देता. आपण खरोखर सर्वात धाडसी आहात! फ्रंटलाइनवर असणं सोपं नाही, परंतु आम्ही आपल्या प्रयत्नांचं खरोखर कौतुक करतो.”


दरम्यान, त्याचा मृत्यू कसा झाला याबाबत ठोस माहिती नसल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.

सिद्धार्थ शुक्लाला त्याच्या जवळच्या मित्रांनी मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये नेलं. सिद्धार्थ शुक्लाची बहीण आणि त्याचा मेहुणा अभिनेत्यासह रुग्णालयात पोहोचले होते. पोलिसांना आज सकाळी सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूची माहिती मिळाली. पोलिस अजूनही रुग्णालयात आहेत. त्याच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदनानंतरच कळेल असं पोलिसांनी म्हटलं आहे.

सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) मृतदेहाचे शवविच्छेदन दुपारी १२.३० नंतर केलं जाऊ शकतं. पोलिसांनी म्हटलं आहे की ते लवकरच त्याचे कुटुंबीय आणि जवळच्या लोकांचे जबाब नोंदवतील.

सिद्धार्थ छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे. ‘बालिका वधू’ या मालिकेतून त्याने अनेकांची मने जिंकली होती. या मालिकेनं त्याला लोकप्रियता मिळवून दिली होती. त्याने रिअॅलिटी शो बिग बॉस १३मध्ये सहभाग घेतला होता आणि त्या सिझनचा तो विजेताही ठरला होता. त्यानंतर त्याने खतरों के खिलाडी या शोच्या सातव्या सिझनमध्येही सहभाग घेतला होता.

१२ डिसेंबर १९८० साली सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला. त्याने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. २००४ साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर २००८मध्ये त्याने बाबुल का आंगन छूटे या मालिकेत काम केले. पण ‘बालिका वधू’ या मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली होती.हेही वाचा

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर पोलिसांचं 'हे' वक्तव्य, शवविच्छेदनानंतर....

अभिनेत्री सायरा बानू आयसीयूत दाखल, श्वास घेण्यास होतोय त्रास

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा