Advertisement

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर पोलिसांचं 'हे' वक्तव्य, शवविच्छेदनानंतर....

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर पोलिस अजूनही रुग्णालयात आहेत. याप्रकरणी तपास सुरू आहे.

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर पोलिसांचं 'हे' वक्तव्य, शवविच्छेदनानंतर....
SHARES

बिग बॉस फेम आणि सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वृत्तानुसार, हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाला आहे. पण त्याचा मृत्यू कसा झाला याबाबत ठोस माहिती नसल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.

काल रात्री ९.३०च्या सुमारास सिद्धार्थ शुक्लाला त्याच्या जवळच्या मित्रांनी मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये नेलं. सिद्धार्थ शुक्लाची बहीण आणि त्याचा मेहुणा अभिनेत्यासह रुग्णालयात पोहोचले होते. पोलिसांना सकाळी सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूची माहिती मिळाली. पोलिस अजूनही रुग्णालयात आहेत. त्याच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदनानंतरच कळेल असं पोलिसांनी म्हटलं आहे.

सिद्धार्थ शुक्लाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन दुपारी १२.३० नंतर केलं जाऊ शकतं. पोलिसांनी म्हटलं आहे की ते लवकरच त्याचे कुटुंबीय आणि जवळच्या लोकांचे जबाब नोंदवतील.

आतापर्यंत सिद्धार्थ शुक्लाच्या शरीरावर कोणत्याही बाह्य जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. पोलिसांना याबाबत कोणतीही घाई करायची नाही. पोलिसांना रेकॉर्डवर बोलायचे आहे, त्यामुळे पोलीस वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहेत.

सिद्धार्थचे हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची माहिती मुंबईतील कुपर रुग्णालयानं दिली आहे. बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थनं काही औषधे घेतली होती असंही बोललं जातंय. याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती नाही. त्यानंतर रात्री त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी सिद्धार्थचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं समोर आलं.

सिद्धार्थ छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे. ‘बालिका वधू’ या मालिकेतून त्याने अनेकांची मने जिंकली होती. या मालिकेनं त्याला लोकप्रियता मिळवून दिली होती. त्याने रिअॅलिटी शो बिग बॉस १३मध्ये सहभाग घेतला होता आणि त्या सिझनचा तो विजेताही ठरला होता. त्यानंतर त्याने खतरों के खिलाडी या शोच्या सातव्या सिझनमध्येही सहभाग घेतला होता.

१२ डिसेंबर १९८० साली सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला. त्याने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. २००४ साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर २००८मध्ये त्याने बाबुल का आंगन छूटे या मालिकेत काम केले. पण ‘बालिका वधू’ या मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली होती.



हेही वाचा

'बिग बॉस १३'चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन

दृष्टीहीन हिमानी बुंदेला ठरल्या कौन बनेगा करोडपती -13 च्या पहल्या करोडपती

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा