Advertisement

दृष्टीहीन हिमानी बुंदेला ठरल्या कौन बनेगा करोडपती -13 च्या पहल्या करोडपती

२३ऑगस्ट रोजी या शोचा प्रीमिअर झाला आणि शोला पहिले करोडपती स्पर्धक मिळाली आहे.

दृष्टीहीन हिमानी बुंदेला ठरल्या कौन बनेगा करोडपती -13 च्या पहल्या करोडपती
SHARES

‘कौन बनेगा करोडपती’ हा लोकप्रिय शो छोट्या पडद्यावर दाखल झाला आहे. २३ऑगस्ट रोजी या शोचा प्रीमिअर झाला आणि शोला पहिले करोडपती स्पर्धक मिळाली आहे. ३० आणि ३१ऑगस्टला या भाग प्रेक्षकांना पाहता येईल.

KBC 13 च्या एका प्रोमोत स्पर्धक हिमानी बुंदेला हॉट सीटवर दिसत आहेत. त्यांनी १ कोटी रुपयांच्या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले आहे. तर आता त्या ७ कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहेत. त्या ‘कौन बनेगा करोडपती 13’ च्या पहिल्याविजेता ठरल्या आहेत.

हिमानी या आग्रा इथं शिक्षिका आहेत. या शोमध्ये त्या आपल्या वडिलांसोबत पोहोचल्या. आपल्या मुलीचा अभिमान वाटत असल्याचं हिमानी यांच्या वडिलांनी म्हटलं आहे. हिमानी या दृष्टीहीन आहेत. या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन हे हिमानी यांची स्तुती करताना दिसत आहेत.

हिमानी यांचे वडील विजय बुंदेला यांनी सांगितलं की, हिमानी १५ वर्षांच्या असताना एका अपघातात त्यांची दृष्टी गेली. डॉक्टर व्हायचे स्वप्न उराशी बाळगलेल्या हिमानी यांना त्यांचे भविष्य अंधारात दिसू लागले. मात्र कुटुंबीयांच्या प्रोत्साहनानं त्यांनी ग्रॅज्युएशन केलं आणि त्यांनी बीएडसाठी त्यांचं केंद्रीय विद्यालयात सिलेक्शन झालं.

हिमानी यांनी सांगितल्यानुसार, मागील पाच वर्षांपासून त्या केबीसीत सहभागी होण्यासाठी नोंदणी करत होत्या. एप्रिल महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात हिमानी यांनी केबीसीकडून कॉल आला.

हिमानी यांनी अपंग मुलांसाठी समाजात जागरुकता आणण्याची मोहिम हाती घेतली आहे. या शोमधून जिंकलेल्या सगळ्या पैशांचा वापर हिमानी या त्यांच्या मोहिमेसाठी करणार आहेत. या शोमध्ये हिमानी यांनी एक सुंदर कवितादेखील ऐकवली. त्या म्हणाल्या, "यूं तो जिंदगी सब काट लेते हैं यहां मगर जिंदगी जियो ऐसे की मिसाल बन जाए.'



हेही वाचा

अखेर प्रतिक्षा संपली, 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अमिताभ बच्चन यांच्याशी बोलायचंय? अॅमेझॉननं दिली ही संधी, जाणून घ्या

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा