ऐश्वर्या रायच्या वडिलांचे निधन

 Mumbai
ऐश्वर्या रायच्या वडिलांचे निधन
Mumbai  -  

मुंबई - अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचे वडील कृष्णराज राय (वय 72) यांचे आज सायंकाळी चार वाजता निधन झाले. वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात गेल्या तीन आठवड्यांपासून राय यांच्यावर उपचार सुरू होते. कर्करोगाने ग्रासलेल्या राय यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. ऐश्वर्याच्या चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिला कृष्णराज राय यांचे खूप मार्गदर्शन आणि भक्कम पाठबळ लाभले होते.

Loading Comments