जॉली एलएलबी - 2 मध्ये बीरबलाशी प्रेरित अक्षय

Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपट जॉली एलएलबी - 2 बद्दल खुपच उत्साही दिसतोय. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. ज्याला दर्शकांनी चांगलीच पसंती दिलीय. जॉली एलएलबी - 2 हा सिनेमा 2013 मध्ये आलेल्या सिनेमाचा सिक्वल असून त्याचं दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलं होतं. ज्यामध्ये अभिनेता अरशद वारसीने मुख्य भूमिका निभावली होती. अभिनेता अक्षय कुमारचं म्हणणं आहे की, त्याची या चित्रपटातील भूमिका बीरबलाशी प्रेरित आहे. अकबर हा बादशाह अकबरच्या नऊ रत्नांपैकी एक असल्याचं मानल जात होतं.

अक्षय कुमारच्या बालपणी वडील ओम भाटिया हे नेहमीच अक्षयला अकबर-बिरबलच्या गोष्टी सांगत असत. लहानपणी अक्षय कुमारला अकबर बिरबलच्या गोष्टी ऐकणं खुपच आवडत असे. बिरबलला लहानपणापासूनच हिरो मानत आल्याचं अक्षयनं सांगितलं. आणि या भूमिकेबद्दल तिला विचारले असता त्यानं लगेच होकार दिला.

Loading Comments