'जनावरांपेक्षाही खालच्या थराला गेलोय आपण'

    मुंबई  -  

    मुंबई - नववर्षाच्या सेलिब्रेशन दरम्यान बंगळुरुमध्ये पोलीस बंदोबस्त असतानाही मुलींचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे देशाची मान शरमेनं झुकली आहे. मात्र या घटनेनंतर काहींनी आपल्या अकलेचे तारे तोडत मुलींना दोष दिला. अभिनेता अक्षय कुमारने या घटनेचा निषेध स्वत:चा व्हिडिओ व्हायरल करत केला. 'ही घटना पाहून माझं रक्त खवळलं. आपण जनावरापासून सैतान असा उलटा प्रवास करतो की काय असं मला क्षणभर वाटलं. मुलींच्या तोकड्या कपड्यावर बोलणाऱ्यांना देखील अक्षय कुमारने खडे बोल सुनावले. या व्हिडिओतून मी एक कलाकार म्हणून नाही तर मीही एका मुलीचा बाप आहे म्हणून माझ्या भावना व्यक्त केल्या. मला मुलगी नसती तरीही मी असाच व्यक्त झालो असतो असंही तो या आपल्या व्हिडिओत म्हणाला. विनयभंगाच्या त्या घटनेनंतर आपल्या अकलेचे तारे तोडून मुलींना दोषी धरणाऱ्यांची अक्षयने लायकीच काढली आहे.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.