Advertisement

आलिया-रणबीर झाले आई-बाबा, कपूर कुटुंबात आनंदाचे वातावरण

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आई-वडील झाले आहेत.

आलिया-रणबीर झाले आई-बाबा, कपूर कुटुंबात आनंदाचे वातावरण
SHARES

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आई-वडील झाले आहेत. आलियाने एका गोंडस छोट्या मुलीला जन्म दिला आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे आज सकाळी ७.३० वाजता गिरगावातील ‘एच.एन.रिलायन्स’ रुग्णालयात पोहोचले होते. ते पहिल्या बाळाच्या प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्याची माहितीही समोर येत होती.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही तासातच तिला प्रसूती कळा सुरु झाल्या. यानंतर दुपारी १२ ते १२.३० च्या दरम्यान तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

आलिया भट्ट रुग्णालयात दाखल झाल्याचे कळताच तिची आई सोनी राजदान आणि सासू नीत कपूर या दोघीही रुग्णालयात उपस्थित होत्या. त्याबरोबर कपूर आणि भट्ट कुटुंबातील इतर सदस्यांनीही रुग्णालयात धाव घेतली होती.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे लग्न १४ एप्रिल २०२२ रोजी मुंबईत झाले होते. लग्नानंतर दोन महिन्यांनी म्हणजे जून महिन्याच्या अखेरीस त्यांनी चाहत्यांना ही गुडन्यूज दिली होती. ते दोघेही सातत्याने चर्चेत होते. कपूर कुटुंबात येणाऱ्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले होते.तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला होता. त्यांचे अनेक फोटोही व्हायरल झाले होते.



हेही वाचा

मांजरेकरांच्या चित्रपटात अक्षयकुमार छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा