बीकेसीत होणार अनोखा विक्रम...

  Pali Hill
  बीकेसीत होणार अनोखा विक्रम...
  मुंबई  -  

  मुंबई - रविवारी दुपारी तीन वाजल्यापासून वांद्रे-कुर्ला संकुलात एका अनोख्या विक्रमासाठी प्रयत्न केला जाणार आहे. एकाच वेळी जास्तीत जास्त महिला एक मिनिटासाठी 'अॅब्डोमिनल प्लँक पोझिशन'मध्ये राहून हा विक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहेत. 'अॅब्डोमिनल प्लँक पोझिशन' म्हणजे कोपर आणि पावलाच्या आधारावर शरीर तोलून धरलेली अवस्था. या विक्रमाला ग्लॅमरचं वलयही असेल. जॅकलिन फर्नांडिस, कल्की कोचेलिन, साक्षी मलिक, उज्ज्वला राऊत, निधी कमाल, सुचेता पाल आदींचाही यात समावेश असेल.

  एका मिनिटापेक्षा जास्त वेळ शरीर असं तोलून धरणाऱ्यांना गिफ्ट व्हाउचरही मिळेल. पुमा या जगप्रसिद्ध ब्रँडच्या ग्लोबल पेजवर चमकण्याची संधी आणि विक्रम झाल्यावर त्याचं प्रमाणपत्रही सहभागी होणाऱ्यांना मिळणार आहे.

  Loading Comments
  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.