Advertisement

‘अमर फोटो स्टुडिओ’ टीमचा केरळसाठी मदतीचा हात

‘अमर फोटो स्टुडीओ’ या मराठी रंगभूमीवर गाजत असलेल्या नाटकाच्या टीमने केरळच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात देत आर्थिक सहाय्य केलं आहे. ‘अमर फोटो स्टडिओ’ने त्यांच्या नाटकांचं ठाणे आणि बोरिवलीमधील प्रयोग महापुरामुळे बाधित झालेल्या केरळमधील जनतेला मदत करण्यासाठी आयोजित केलं होतं.

‘अमर फोटो स्टुडिओ’ टीमचा केरळसाठी मदतीचा हात
SHARES

सामाजिक बांधिलकीचं भान राखून कलेची परंपरा जपणारे काही कलाकार केवळ मनोरंजनापुरते रसिकांसमोर येत नाहीत, तर एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या मदतीसाठीही धावून जातात. याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. ‘अमर फोटो स्टुडीओ’ या मराठी रंगभूमीवर गाजत असलेल्या नाटकाच्या टीमने केरळच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात देत आर्थिक सहाय्य केलं आहे.


एक लाखांची मदत

‘कलाकारखाना’ आणि ‘सुबक’ नाट्यसंस्थेला सामाजिक जबाबदारीचं भान आहे आणि म्हणूनच ‘अमर फोटो स्टडिओ’ने त्यांच्या नाटकांचं ठाणे आणि बोरिवलीमधील प्रयोग महापुरामुळे बाधित झालेल्या केरळमधील जनतेला मदत करण्यासाठी आयोजित केलं होतं. 

‘चीफ मिनीस्टर रिलीफ फंड फॅार केरळ’ या योजनेत आपलाही सहभाग असावा या हेतूने ‘अमर फोटो स्टुडीओ’च्या टीमने दोन प्रयोगांच्या उत्पन्नात थोडी भर घालून 1 लाख 1 हजार 1 रुपयांची आर्थिक मदत वरील योजनेसाठी मुख्यमंत्री यांना देऊ केली.


टीमने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

‘अमर फोटो स्टुडिओ’च्या टीमने मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. या प्रसंगी सुबकचे सर्वेसर्वा निर्माते-अभिनेते सुनील बर्वे आणि नाटकात मुख्य भूमिका साकारणारा अमेय वाघ उपस्थित होते. ‘अमर फोटो स्टुडीओ’च्या टीमने उचललेलं हे पाऊल कौतुकास्पद असून, इतर कलाकार-तंत्रज्ञांना प्रोत्साहित करणारं आहे. निपुण धर्माधिकारीने दिग्दर्शित केलेल्या या नाटकात अमेयसोबत सखी गोखले, सुव्रत जोशी आणि पूजा ठोंबरे हे कलाकार आहेत.


हेही वाचा - 

मकरंद घेतोय पाहुण्यांच्या अंतरंगाचा वेध

स्पृहा जोशीचा पती वरद लघाटेचं सिनेसृष्टीत पदार्पण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा