Advertisement

मकरंद घेतोय पाहुण्यांच्या अंतरंगाचा वेध

कलर्स मराठी वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘अस्सल पाहुणे, इरसाल नमुने’ या कार्यक्रमात समाजात नावाजलेल्या व्यक्ती माणूस म्हणून कशा आहेत, हे जाणून घेतलं जाणार आहे. त्यांची कधी न पाहिलेली बाजू आणि त्यांच्याबद्दलचे कधी न ऐकलेले किस्से मकरंदसोबत ऐकायला मिळणार आहेत. या कार्यक्रमामध्ये मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील, समाजसेवेमध्ये कार्यरत असलेले, राजकारण, क्रीडा या क्षेत्रांतील महाराष्ट्रातील नावाजलेल्या मंडळींसोबत मकरंद गप्पा मारणार आहे.

मकरंद घेतोय पाहुण्यांच्या अंतरंगाचा वेध
SHARES

प्रत्येकालाच आपल्या लाडक्या आणि नावाजलेल्या व्यक्तींबाबत जाणून घ्यायला आवडत असतं. ही मंडळी त्यांच्या खऱ्या आयुष्यामध्ये कशी आहे?, त्यांचे विचार काय आहेत?, त्यांचा जीवनप्रवास कसा होता?, कसे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले? असे बरेच प्रश्न सामान्य माणसांच्या मनामध्ये असतात. अशा व्यक्तींच्या अंतरंगात डोकावत त्यांचं मनोगत जाणून घेण्याचं काम अभिनेता मकरंद अनासपुरेनं सुरू केलं आहे.

अस्सल पाहुणे, इरसाल नमुने

कलर्स मराठी वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘अस्सल पाहुणे, इरसाल नमुने’ या कार्यक्रमात समाजात नावाजलेल्या व्यक्ती माणूस म्हणून कशा आहेत, हे जाणून घेतलं जाणार आहे. त्यांची कधी न पाहिलेली बाजू आणि त्यांच्याबद्दलचे कधी न ऐकलेले किस्से मकरंदसोबत ऐकायला मिळणार आहेत. या कार्यक्रमामध्ये मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील, समाजसेवेमध्ये कार्यरत असलेले, राजकारण, क्रीडा या क्षेत्रांतील महाराष्ट्रातील नावाजलेल्या मंडळींसोबत मकरंद गप्पा मारणार आहे.

थोडं मिश्कील, थोडं गंभीर

किशोर चौघुले, प्राजक्ता हनमघर, भूषण कडू, ओंकार भोजने ही काही इरसाल पात्रं या कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवणार आहेत. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वीकारलेला मकरंद म्हणाला, ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ हा थोडासा वेगळा कार्यक्रम आहे. 

कारण विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यांच्याविषयी आपल्याला थोडीफार माहिती असते; परंतु या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्या अंतरंगाचा शोध घेणार आहोत. त्यांच्या क्षेत्राशी निगडीत नसलेल्या इतर क्षेत्राबद्दल तसंच दुसऱ्या गोष्टींबद्दल त्यांचं मत त्यांचे विचार विस्तारानं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. थोडं मिश्कील, थोडं गंभीर असं या कार्यक्रमाचं काहीसं मिश्र स्वरूप आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा