Advertisement

'द फॅमेली मॅन'च्या दुसऱ्या सिजनचा पोस्टर रिलीज

Amazon प्राइम व्हिडिओनं मंगळवारी 'द फॅमिली मॅन' च्या दुसऱ्या सिजनचा पोस्टर लाँच करून चाहत्यांना चकित केलं आहे.

'द फॅमेली मॅन'च्या दुसऱ्या सिजनचा पोस्टर रिलीज
SHARES

Amazon प्राइम व्हिडिओनं मंगळवारी 'द फॅमिली मॅन' च्या दुसऱ्या सिजनचा पोस्टर लाँच करून चाहत्यांना चकित केलं आहे. या पोस्टरच्या टीझरमध्ये २०२१चा टाइम बॉम्ब असल्याचं चित्र आहे.

नवीन वर्षात श्रीकांत तिवारी (मनोज वाजपेयी) आणि शरिब हाश्मी (जेके तळपदे) एका मोठ्या मिशनवर असतील. त्यात कुटुंब आणि देशाची सुरक्षा या जबाबदाऱ्या निभावताना त्याची तारेवरचटी कसरत पुन्हा एकदा पाहता येणार आहे.

१ सीझन रिलीझ झाल्यापासून, द फॅमिली मॅनला जगभरातून प्रचंड प्रेम आणि कौतुक प्राप्त झाले. राज आणि डीके निर्मित आणि दिग्दर्शित ‘द फॅमिली मॅन’ लवकरच अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर येणार आहे.

प्रिया मणि आणि शरद केळकर यांच्यासमवेत मनोज बाजपेयी आणि शरब हाश्मी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकतील. शिवाय मालिकेत दक्षिण सुपरस्टार सामंता अक्किनेनीचा डिजिटल डेब्यूदेखील आहे. प्रेक्षकांनी तिला या अवतारात पूर्वी कधी पाहिले नव्हते.

फॅमिली मॅन ही थ्रीलर अक्शन-ड्रामा सिरीज आहे. मध्यमवर्गीय श्रीकांत तिवारीची कहाणी आहे जो राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या एका खास सेलसाठी गुप्तहेर म्हणून काम करत असतो. श्रीकांत देश आणि कुटुंब या जबाबदारीमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न करत असतो.हेही वाचा

ए.आर. रेहमान यांच्या आई करीमा बेगम काळाच्या पडद्याआड

सोनू सूदचं 'आय एम नो मसिहा' पुस्तक लाँच

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा