Advertisement

सोनू सूदचं 'आय एम नो मसिहा' पुस्तक लाँच

सोनूनं लोकांची मदत करताना त्याला आलेले अनुभव पुस्तकाच्या रुपातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

सोनू सूदचं 'आय एम नो मसिहा' पुस्तक लाँच
SHARES

लॉकडाऊनच्या काळात आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी अभिनेता सोनू सूद देवदूत म्हणून पुढे आला. अनेक गरजू लोकांना त्याने मदतीचा हात दिला. इतकेच नाही तर सोनूने गरजूंच्या मदतीसाठी एक-दोन नव्हे तर आपल्या तब्बल आठ मालमत्ता गहाण ठेवल्या आणि त्यातून त्याने १० कोटींचे कर्ज उभे केले.

आता सोनूनं लोकांची मदत करताना त्याला आलेले अनुभव पुस्तकाच्या रुपातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आय एम नो मसिहा’ हे सोनूच्या पुस्तकाचं नाव आहे. एक व्हिडिओ शेअर करुन सोनूनं त्याचं नवीन पु्स्तक वाचकांच्या भेटीला आल्याचं सांगितलं आहे.

व्हिडिओ शेअर करुन सोनूनं लिहलं आहे की, 'माझे पुस्तक ‘आय एम नो मसिहा’ बाजारात आलं आहे. माझी स्वाक्षरी असलेलं पुस्तक तुम्हाला मुंबई विमानतळ आणि BookScetra इथं मिळतील. शिवाय तुम्ही ऑनलाइनही ते ऑर्डर करू शकता. हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे.' हे पुस्तक अॅमेझॉन आणि किंडल सारख्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सोनू सूदनं हिंदी, इंग्रजी, तेलगू, तामिळ, कन्नड, पंजाबी चित्रपटात काम केलं आहे. १९९९ मध्ये 'कल्लाझागर' या तामिळ चित्रपटापासून त्यानं आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. २००२ साली 'शहिद-ए-आझम' या हिंदी चित्रपटातून सोनूने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. युवा,आशिक बनाया आपने, शूट आऊट अॅट वडाला, जोधा अकबर, दबंग, हॅप्पी न्यू ईयर, पलटन, आर राजकुमार या हिंदी चित्रपटांमध्ये त्यानं काम केलंय.


हेही वाचा

२०२० मधील १०० कोटींच्या घरात मजल मारणारे ५ चित्रपट

अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा