Advertisement

अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप

बिग बींनी शेअर केलेल्या कवितेमुळे त्यांच्यावर चोरीचा आरोप लावण्यात आला आहे.

अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप
SHARES

महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. विविध कवित, संदेशाच्या माध्यमातून ते चाहत्यांसोबत संवाद साधत असतात. नुकतीच त्यांनी एक कविता पोस्ट केली आहे. पण या कवितेमुळे त्यांच्यावर चोरीचा आरोप लावण्यात आला आहे.


थोड़ा पानी रंज का उबालिये

खूब सारा दूध खुशियों का

थोड़ी पत्तियां ख्यालों की..

थोड़े गम को कूटकर बारीक,

हंसी की चीनी मिला दीजिये..

उबलने दीजिये ख्वाबों को

कुछ देर तक..!

यह जिंदगी की चाय है जनाब..

इसे तसल्ली के कप में छानकर

घूंट घूंट कर मजा लीजिये...!!


टीशा अग्रवाल नावाच्या एका महिलेनं हा दावा केला आहे की, ही त्यांची कविता आहे. त्यांनी बिग बी यांच्या फेसबुक पोस्टवरही कमेंट केली आहे. मला याचं श्रेय मिळायला हवं, अशी मागणी त्यांनी केली आहे. टीशानं आपल्या फेसबुक पोस्टवर लिहिलं आहे की, जेव्हा अमिताभ बच्चन तुमची पोस्ट कॉपी करतात आणि त्याचं क्रेडिटही देत नाही..अशावेळी आनंद व्यक्त करायचा की दु:ख?

टीशा अग्रवाल यांनी ही कविता २४ एप्रिल २०२० मध्ये लिहिली होती. ही कविता त्यांनी फेसबुकवरही पोस्ट केली होती. टीशा एक कवियित्री आहेत आणि फेसबुकवर विविध कविता शेअर करतात. चहा या विषयाला धरुन त्यांनी अनेक फेसबुक पोस्ट केल्या आहेत. यावर अमिताभ बच्चन यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.


हेही वाचा

'सनम हॉटलाईन'ला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद

कंगनाला दिंडोशी न्यायालयाचा झटका, तर पडू शकतो घरावर हातोडा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा