उत्तम सिंग यांना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

Ravindra Natya Mandir
उत्तम सिंग यांना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
उत्तम सिंग यांना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
उत्तम सिंग यांना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
उत्तम सिंग यांना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
See all
मुंबई  -  

प्रभादेवी - प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरमध्ये बुधवार 30 नोव्हेंबरला सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित लता मंगेशकर पुरस्कार प्रदान सोहळा 2016 चं आयोजन करण्यात आलं होते. यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक उत्तम सिंग यांना प्रदान करण्यात आला. 5 लाख रुपये मानपत्र, सन्मानचिन्ह असं या पुरस्काराच स्वरूप होत. या पुरस्कार सोहळ्याचं सूत्र संचलन अभिनेत्री दीप्ती भागवत यांनी केलं. या वेळी जुन्या आणि नव्या गाण्यांची मैफल रंगली होती. कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा, पद्मभूषण खैयाम, महापौर स्नेहल आंबेकर, वर्षा नायर, सांस्कृतिक कार्यसंचालक संजय पाटील, विश्वास पाटील, आशा खाडिलकर आदी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कार प्रदान सोहळ्यात उत्तम सिंग यांच्या कारकिर्दीवर आधारित चित्रफित दाखवण्यात अाली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.