अनिल कपूर भेटला ब्रिटीश मॅरेथॉनपटू फौजा सिंहना

  Mumbai
  अनिल कपूर भेटला ब्रिटीश मॅरेथॉनपटू फौजा सिंहना
  मुंबई  -  

  मुंबई - बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर सध्या त्याच्या कॉमेडी 'मुबारकन' सिनेमाच्या शुटींगसाठी 50 दिवस लंडनमध्ये आहे. यावेळी शुटींगच्या वेळी त्याची भेट ब्रिटीशचे 105 वर्षीय मॅरेथॉनपटू ब्रिटीश-सिख फौजा सिंह यांच्याशी झाली. यावेळी या दोघांमध्ये मनमोकळ्या गप्पा देखील झाल्यात. याबाबत अनिल कपूर याला विचारले असता त्याने फौजा सिंह यांच्यामुळे प्रेरणा मिळते. या वयातही त्यांची उर्जा ही तरुणांना लाजवेल अशीच असल्याचे सांगत, त्यांनी मॅरेथॉनमध्ये केलेल्या रेकॉर्डचेही त्याने तोंडभरून कौतूक केले. अनिल कपूरने यावेळी फौजा सिंह यांचे आशीर्वाद देखील घेतले. फौजा सिहं यांनी ब्रिटीश मॅरेथॉनमध्ये एक विक्रम केला आहे. तसेच 200 मीटर,400मीटर,800मीटर आणि 3000 मीटर मॅरेथॉनमध्येही त्यांनी एक वेगळा इतिहास रचला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.