'मजार' अव्वल

 vile parle
'मजार' अव्वल
vile parle, Mumbai  -  

विलेपार्ले - आपल्या वेगळ्या आणि बहारदार अभिनयाच्या जोरावर अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाची 'मजार' ही एकांकिका हिंदी आयएनटी स्पर्धेत अव्वल अाली.

11 वी हिंदी आयएनटी स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी साठ्ये महाविद्यालयाच्या आँडीटोरीअम मध्ये रंगली. अस्तित्व, आयएनटी आणि साठ्ये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत 10 महाविद्यालये सहभागी झाली. त्यातील 4 महाविद्यालये अंतिम फेरीमध्ये दाखल झाली. या महाविद्यालयांमध्ये अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय, नाटवाला ही संस्था, डहाणूकर महाविद्यालय, पी. डी. दालमिया महाविद्यालय यांचा समावेश होता.

Loading Comments