Advertisement

'देवा' च्या एन्थम साँगला प्रभूदेवाने दिली दाद !


'देवा' च्या एन्थम साँगला प्रभूदेवाने दिली दाद !
SHARES

हल्ली सोशल मिडिया सगळ्यांच्याच आयुष्यातील खूप महत्वाचा भाग झाला आहे. फक्त खास क्षण शेअर करण्यासाठीच नाही, तर अगदी एखाद्या नवीन सिनेमाची घोषणा असो किंवा सिनेमातील नवीन गाणं असो, या गोष्टीही हल्ली सोशल मीडियाद्वारे रिलीज केल्या जातात. लवकरच प्रदर्शित होणारा मराठी सिनेमा 'देवा'चं नवं कोरं अॅन्थम साँग प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शनात 'देवा' असणा-या प्रभूदेवानेने त्याच्या ट्विटर अकाउंटद्वारे केलंंय. हे अॅन्थम साँग शेअर करत त्याने 'देवा'च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा ही दिल्या.


अजय गोगावले याचा कमालीचा आवाज या गाण्याला लाभला असून, क्षितीज पटवर्धन लिखित या गाण्याचे अमितराज यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. देवाच्या रंगबेरंगी व्यक्तिमत्वाला बोलके करणारे हे गाणे लोकांना देखील खूप आवडत आहे. मुरली नलप्पा दिग्दर्शित 'देवा' हे अतरंगी पात्र अंकुश चौधरीने साकारले असून, विविध रंगांनी नटलेल्या या गाण्यात प्रेक्षकदेखील रंगून जात असल्याचे पाहायला मिळत आहे.हेही वाचा

'देवा'चा टीजर लॉन्च, अंकुश-तेजस्विनीचा नवा अंदाज!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा