Advertisement

'देवा'चा टीजर लॉन्च, अंकुश-तेजस्विनीचा नवा अंदाज!


'देवा'चा टीजर लॉन्च, अंकुश-तेजस्विनीचा नवा अंदाज!
SHARES

काही सिनेमांची चर्चा त्याच्या नावापासूनच जास्त होऊ लागते. त्यातलाच एक होता 'देवा'. अंकुश चौधरीचा हटके लूक पाहायला मिळणार असल्याने या सिनेमाची चर्चा खूप आधीपासूनच होती आणि फायनली या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांसमोर आलाय.

अंकुशचा हटके अंदाज तर आहेच, पण या सिनेमाच्या टीझरमधून मराठीची ग्लॅमरस अभिनेत्री तेजस्विनी पंडित प्रथमच एका नव्या लुकमधून प्रेक्षकांसमोर आली आहे. ज्यात ती लेखिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या टीझरमध्ये, तिने साकारलेल्या 'माया' या व्यक्तिरेखेच्या नजरेतून 'देवा'चा शोधप्रवास आपल्याला पाहायला मिळतो.

 


शिवाय अतरंगी देवाच्या रंगबेरंगी छटा या टीजरमध्ये दिसून येत असून, डॉ. मोहन आगाशे, वैभव मांगले, पंढरीनाथ कांबळे, मयूर पवार हे कलाकारदेखील आपल्याला पाहायला मिळतात. विशेष म्हणजे, यापूर्वी प्रदर्शित करण्यात आलेल्या 'देवा' सिनेमाच्या पोस्टर आणि मोशन पिक्चर्समध्ये आतापर्यंत पाठमोरा दिसणारा अंकुश चौधरीदेखील प्रेक्षकांसमोर आला असल्यामुळे, त्याच्या चाहत्यांसाठी हा टीझर खास ठरत आहे. मायाच्या नजरेतला हा 'देवा' प्रेक्षकांसाठी मोठा कुतुहलाचा विषय बनत आहे.  तुम्ही जर देवाचा टीजर पहिला नसेल, तर नक्की पहा.हेही वाचा

न्यूड...रवी जाधवचा वेगळ्या धाटणीचा चित्रपट!


संबंधित विषय
Advertisement