SHARE

मराठी चित्रपटसृष्टीत दमदार चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये रवी जाधव यांचे नाव आवर्जून घेतले जाते. अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. 'कच्चा लिंबू' चित्रपटातून नायक म्हणून झळकलेला दिग्दर्शक रवी जाधव त्याचा आगामी सिनेमा 'न्यूड' लवकरच प्रेक्षकांच्या समोर घेऊन येत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक रवीनं त्याच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे.'न्यूड' चित्रपटाचं पोस्टर शेअर करत त्यानं कॅप्शन दिली आहे की, 'हा सिनेमा त्या सर्व मॉडेल्सला समर्पित आहे, ज्या एका आर्टिस्टसाठी न्यूड होतात.' एक महिला आरतीचं ताट घेऊन तुळशी वृंदावनजवळ उभी असल्याचं पोस्टरमध्ये पाहायला मिळतंय. रवी जाधव यांच्या 'न्यूड' चित्रपटाचा टीझर फास्टर फेणेसोबतच थिएटरमध्ये रिलीज केला आहे. या चित्रपटासाठी कोणत्या कलाकारांची वर्णी लागली आहे? याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

'न्यूड' चित्रपटापूर्वी रवी जाधवचा 'रंपाट' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचं देखील पोस्टर रवी जाधव यांनी फेसबुकवर शेअर केलं आहे. 'आजच्या सुसाट जगात सर्वच रंपाट झालंय', अशी कॅप्शनही त्याला देण्यात आली आहे.गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीत बरेच वेगळ्या धाटणीचे चित्रपट येत आहेत. या यादीत आता रवी जाधव यांच्या या दोन्ही चित्रपटांची भर पडली आहे.हेही वाचा

तुम्ही राहुल गांधींची नक्कल करू शकता, मोदींची नाही?


संबंधित विषय
ताज्या बातम्या