अनुप सोनीचा 'क्राईम पेट्रोल'ला राम राम

'क्राइम पेट्रोल' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारा अभिनेता अनुप सोनी याने 'क्राइम पेट्रोल' सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनुपच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. येत्या काही दिवसांत तो कार्यक्रमाला रामराम ठोकणार आहे.

  • अनुप सोनीचा 'क्राईम पेट्रोल'ला राम राम
SHARE

गुन्हेगारी विश्व, तपास या कार्यक्रमांना प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर पसंती देतात. त्यातले सीआयडी आणि क्राइम पेट्रोल हे दोन कार्यक्रम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीचे आहेत. मात्र, या कार्यक्रमाच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे.'क्राइम पेट्रोल' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारा अभिनेता अनुप सोनी याने 'क्राइम पेट्रोल' सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनुपच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. येत्या काही दिवसांत तो कार्यक्रमाला रामराम ठोकणार आहे.


#intense #look ☺️

A post shared by  Annup Sonii (@anupsoni3) on


खुद्द अनुपनेच माध्यमांशी बोलताना याबाबत खुलासा केला आहे. अनुप म्हणाला, 'हो, मी हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आठ वर्ष हा मोठा कालावधी आहे. या कार्यक्रमाने मला खूप चांगल्या आठवणी दिल्या आहेत. आता मी पुन्हा अभिनयाकडे वळायचं ठरवलं आहे. अभिनयालाच माझं प्राधान्य आहे. साधारण गेल्या पाच वर्षांपासून मी अभिनय केलेला नाही. त्यामुळे आता मी मालिका आणि चित्रपटांकडे लक्ष केंद्रीत करणार आहे’.

आता या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोण करणार? याबबात चॅऩलकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.हेही वाचा

सई म्हणतेय #बॅगवती कमिंग सून!

संबंधित विषय
ताज्या बातम्या