‘अपराध मीच केला’ लवकरच रंगभूमीवर

  Dadar
  ‘अपराध मीच केला’ लवकरच रंगभूमीवर
  मुंबई  -  

  दादर - नानावटी खून खटल्यावर आधारित ‘अपराध मीच केला’ हे गाजलेलं नाटक तिसऱ्यांदा नव्या वर्षात रंगभूमीवर येणार आहे. या नाटकाचा मुहूर्त दादरमधल्या किवि प्रॉडक्शन्सच्या कार्यालयात संपन्न झाला. या वेळी नाटकाची तालीमही झाली.

  1964 मध्ये रंगभूमीवर आलेल्या या नाटकाची तब्बल 52 वर्षानंतर ‘किवि प्रॉडक्शन्स’च्या माध्यमातून पुनर्निर्मिती होतेय.‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ व ‘करायला गेलो एक’ या दोन यशस्वी नाटकांनंतर किशोर सावंत आता विवेक नाईक यांच्या साथीनं हे नवं नाटक घेऊन येत आहेत. गोट्या सावंत या नाटकाचे सूत्रधार म्हणून आणि प्रवीण दळवी हे व्यवस्थापक म्हणून काम पाहाणार आहेत.

  लेखक, नाटककार, गीतकार म्हणून प्रसिद्ध मधुसूदन कालेलकर यांनी हे नाटक लिहलं. या नाटकातील कमांडर अशोक वर्टी ही व्यक्तिरेखा त्याकाळी अभिनेते अरुण सरनाईक यांनी लोकप्रिय केली होती. नव्या संचात ही भूमिका सुप्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर साकारणार आहेत. त्यांच्या सोबत निशा परुळेकर, विजय गोखले, विघ्नेश जोशी, संजय क्षेमकल्याणी, स्वतः किशोर सावंत, सोनाली बंगेरा, विलास गुर्जर, यश जोशी (बालकलाकार) यांच्या भूमिका आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.