• चित्रातून ग्रामीण भागाचे दर्शन
  • चित्रातून ग्रामीण भागाचे दर्शन
  • चित्रातून ग्रामीण भागाचे दर्शन
SHARE

वरळी - नेहरू सेंटरमध्ये चित्रकार सचिन हराळ यांच्या चित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. विविध प्रकारच्या 27 पेंटिंगचा यामध्ये समावेश आहे. सचिन हराळ यांचा हा पहिला सोलो शो आहे. यामध्ये 4 हजारपासून 1 लाख रुपयांपर्यंतच्या चित्रांचा समावेश आहे.

प्रदर्शनात प्रामुख्याने ग्रामीण भागातील परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रांमध्ये ‘टुगेदर’ नावाचे एक चित्र ठेवण्यात आले आहे. चित्रात दाखवलेले जोडपे प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहेत. महाबळेश्वरच्या एका मार्केटमध्ये फुले विकत बसलेले आजी आजोबा या पेंटिंगमध्ये दाखवण्यात आले आहेत. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात जोडीदाराला वेळ देता येत नाही. व्यस्त आयुष्यातून जीवन जगण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यावरच आधारीत ‘टुगेदर’ हे चित्र चेह-यावर किंचित स्मित हास्य आणते. 30 जानेवारीपर्यंत हराळ यांचे हे प्रदर्शन सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत रसिक प्रेक्षकांसाठी खुले रहाणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या