अरुण नलावडे आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत

  Mumbai
  अरुण नलावडे आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत
  मुंबई  -  

  मुंबई - ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी केवळ अभिनयापुरते सीमित न राहता दिग्दर्शनातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या दिग्दर्शनाचा अनोखा पैलू ‘शरयू आर्ट प्रॉडक्शन’ निर्मित ‘ताटवा’ या आगामी मराठी चित्रपटातून पहायला मिळणार आहे. अरुण नलावडे ‘ताटवा’ चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबत यात शिल्पकाराची वेगळी भूमिका साकारताहेत. त्यामुळे ते प्रेक्षकांना अभिनेता आणि दिग्दर्शक अशा दुहेरी भूमिकेत दिसतील.

  डॉ. शरयु पाझारे निर्मित ‘ताटवा’ या चित्रपटाची कथा समाजातील विषमतेवर भाष्य करते. पाथरवट समाजातील होतकरू मुलीचा जीवनप्रवास रेखाटणारी ही कथा आहे. या मुलीला शिल्पकलेचे प्रशिक्षण देणाऱ्या शिल्पकाराच्या भूमिकेत अरुणजी दिसतील. संजय शेजवळ आणि गौरी कोंगे ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. 

  अरुण नलावडे यांनी चित्रपटाविषयी आपले मनोगत मांडले की, सुरुवातीला मी या चित्रपटात फक्त अभिनय करणार होतो. परंतु निर्मात्या डॉ. शरयु पाझारे यांनी, ‘तुम्हीच या सिनेमाचे दिग्दर्शन करणार का?’ असे विचारले. विषयात नाविन्य असल्याने मी ‘ताटवा’चे दिग्दर्शन करण्यास होकार दिला. ‘ताटवा’ म्हणजे कुंपण भेदून जाणे. शिर्षकाप्रमाणे या चित्रपटात पाथरवट समाजातील मुलगी तिच्या हुशारीने पुढे जात समाजासाठी आदर्श निर्माण करते. मनाशी ठरवलं तर एखादी व्यक्ती आकाशाला गवसणी घालू शकते असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला आहे. 

  ‘ताटवा’चित्रपटाचे आणखी एक वेगळेपण म्हणजे अनेक स्थानिक कलाकारांनी यात भूमिका केल्या आहेत. या चित्रपटात अभिनयासोबत दिग्दर्शनाचा अनुभव खूप छान होता, अशा शब्दात अरुण नलावडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.