बगावत करायला 'तो' पुन्हा येतोय!

 Mumbai
बगावत करायला 'तो' पुन्हा येतोय!

'बागी'चा सिक्वल आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दमदार अॅक्शन सीन्स असलेल्या बागी चित्रपटातून टायगरनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता 'बागी २'चं दमदार पोस्टर टायगर श्रॉफनं त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केलं आहे.

साजीद नडियाडवाला हे चित्रपटाचे सह निर्माते आहेत. त्यांनीही या चित्रपटाचे पोस्टर ट्वीट केले आहे. त्यासोबत 'रॉनी इज कमिंग बॅक ऑन २७ एप्रिल २൦१७' असे ट्वीट देखील केले आहे.

'बागी २' चं पोस्टर हॉलिवूड चित्रपटांच्या तोडीसतोड आहे. हातात मोठी बंदूक घेऊन पाठमोरा उभा असलेला टायगर श्रॉफ हॉलिवूडच्या टर्मिनेटर आणि रॅम्बोची आठवण करून देतो. यात तुम्ही टायगर श्रॉफची पिळदार शरीरयष्टी पाहू शकता. त्यामुळे या चित्रपटाची टायगर श्रॉफच्या चाहत्यांना खूप उत्सुकता आहे.

Loading Comments