SHARE

मुंबई - ‘बाहुबली 2’ या चित्रपटाचं आणखी एक पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. दिग्दर्शक राजामौली यांनी स्वत: या चित्रपटाचं पोस्टर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये फक्त बाहुबलीच नव्हे तर, देवसेनेचीही झलक पाहायला मिळत आहे. ‘अमरेंद्र बाहुबली सोबत देवसेना..’ अशी कॅप्शन देत एस. एस. राजामौली यांनी हे पोस्टर शेअर केलं आहे. अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी या पोस्टरमध्ये दिसत असून दोघांच्याही हातात धनुष्य दिसत आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या