महानायकाकडून मराठी सिनेमाचं कौतुक

जुहू - बॉलिवूडमध्ये अँग्री यंग मॅन... महानायक म्हणून ओळख असलेल्या अमिताभ बच्चन यांनी मराठी सिनेमाचं भरभरून कौतूक केलंय. निमित्त होतं 'स्वामी तिन्ही जगाचा भिकारी' या सिनेमाच्या रोलऑन सोहळ्याचं. नुकताच जुहूच्या जे. डब्ल्यु मॅरिएटमध्ये हा सोहळा पार पडला. या वेळी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत शूटिंगची सुरुवात झाली.

गणेश आचार्य दिग्दर्शित या सिनेमात अभिनेता स्वप्निल जोशी गंभीर भूमिका साकारणारेय. तर अभिनेत्री ऋचा इनामदार ही या सिनेमाच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीत पदार्पण करणारेय. 'स्वामी तिन्ही जगाचा भिकारी' हा मराठी सिनेमा 2017 मध्ये प्रदर्शित होणारेय. 

Loading Comments