बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार जाहीर

Dadar
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार जाहीर
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार जाहीर
See all
मुंबई  -  

दादर - यावर्षी उत्तम अनुवादाचा सुप्रतिष्ठित बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार ‘एम आणि हुमराव’ या अनुवादित मराठी पुस्तकाचे अनुवादक शांता गोखले यांना जाहीर झाला आहे. एका विशेष कार्यक्रमात शांता गोखले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठीतील उत्कृष्ट अनुवादासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. निवड समितीत दीपक घारे, प्रफुल्ल शिलेदार, चंद्रकांत भोंजाल यांचा समावेश होता. जेरी पिंटो यांनी लिहिलेल्या ‘एम आणि हुम’ या कादंबरीचा हा मराठी अनुवाद आहे. कवी विंदा करंदीकर यांना मिळालेली ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे सुपूर्द केली होती. या रकमेच्या व्याजातून दरवर्षी अन्य भाषेतून मराठी भाषेत अनुवादित झालेल्या पुस्तकाला हा पुरस्कार देण्यात यावा, असे करंदीकर यांनी सुचवले होते.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.