‘बावरी साद’चा म्युझिक लॉचिंग सोहळा


‘बावरी साद’चा म्युझिक लॉचिंग सोहळा
SHARES

दादर- तरुणांमधील कलासंगीताला वाव मिळावा या हेतूने आणि गायक संगीतकार उपेक्षित राहू नये या प्रबळ भावनेतून प्रमोद वाघमारे यांनी युवती संगीत ही प्रणाली सुरु करून नव्या दर्जेदार संगीत निर्मितीची सुरुवात केली आहे. त्यांच्या बावरी साद या ऑडिओ–व्हिडिओ गीताचा लॉंचिंग सोहळा शनिवार प्लाझामध्ये पार पडला. यावेळी गीतकार शलाका  देशपांडे, संगीतकार नितशे मोरे, गायक मंगेश बोरगांवकर, गायिका किर्ती किल्लेदार, संस्थापक प्रमोद वाघमारे आणि व्हिडिओ निर्मितीतील कलावंत यांनी यावेळी उपस्थिती लावली होती. 

युवती म्युझिक हे ऑनलाइन प्लॅटफॉर्म असल्याचे संस्थापक प्रमोद वाघमारे यांनी सांगितले. तरुण कलाकारांना सहज संधी मिळावी, देशभरातील कलाकारांना इथे संधी देण्यात येणार आहे असंही ते यावेळी म्हणाले. मला कुठे ही हे नवीन कलाकार आहेत असं वाटत नसल्याची प्रतिक्रिया मंगेश बोरगावकरने यावेळी दिली.

संबंधित विषय