Advertisement

भारती-हर्ष अडकले लग्नबंधनात, पाहा त्यांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ


भारती-हर्ष अडकले लग्नबंधनात, पाहा त्यांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ
SHARES

आपल्या जोकने सर्वांनाच खिदळायला लावणारी कॉमेडिअन भारती सिंह आणि लेखक हर्ष लिंबाचिया हे दोघेही ३ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. गोव्यातील मर्क्वीस बीच रिसॉर्ट येथे या दोघांचा विवाहसोहळा पार पडला.

यावेळी भारतीने गुलाबी रंगाचा लहेंगा आणि निळ्या रंगाचा ब्लाऊज असा पेहराव केला होता. यामध्ये भारती खूपच सुंदर दिसत होती. तर हर्षने निळ्या रंगाची शेरवानी घातली होती.  

भारतीने सगळ्या पाहुण्यांची भेट घेत खूप मस्तीही केली. पण यावेळी फेरे घेताना ती भावूक झाली.


त्यांचे मेहंदी, हळद आणि संगीताचा कार्यक्रम गोव्यातील अडामो रिसॉर्ट येथे पार पडला. यावेळी तिच्या लग्नात छोट्या पडद्यावरील जय भानुशाली, माही बिज आणि गोपी बहू फेम जिया माणिक, रित्विक धंजानी, आशा नेगी, मनिष मल्होत्रा, मोना लिसा, करण वाही, राखी सावंत, अनिता हसननंदानी या कलाकारांनी उपस्थित राहून या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.


भारती आणि हर्ष यांच्या मैत्रीची सुरुवात ‘कॉमेडी सर्कस’ पासून झाली. स्टार प्लसवरील ‘नच बलिए’ या डान्स शो मध्ये त्यांनी आपल्या नात्याची कबुली दिली. अखेर रविवार हे दोघेही लग्नबेडीत अडकले.भारती आणि हर्ष यांचा हा फोटो हळदी समारंभाचा आहे, यामध्ये दोघांनीही पिवळे कपडे परिधान केले आहे.लग्नानंतर रिसेप्शन पार्टीत भारतीने ब्लू गाऊन आणि हर्षने पांढरा शर्ट घातला होता.

८ वर्षांपासून कॉमेडी क्षेत्रात काम करत असलेल्या भारतीने आपल्यापेक्षा वयाने सात वर्ष लहान असलेल्या हर्ष लिंबाचियासोबत लग्न केले. ११वी पास असलेला हर्ष लिंबाचिया हा क्रियेटिव्ह रायटर आहे. त्याने 'लापतागंज' आणि 'सजन रे झूठ मत बोलो' या मालिकांसाठी लेखन केलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा