Advertisement

बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांसाठी पुढील टास्क काय?


बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांसाठी पुढील टास्क काय?
SHARES

कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरातील सदस्यांना बुधवारी 'व्यक्त व्हा मुक्त व्हा' हे कार्य दिलं जाणार आहे. खरंतर घरातील सदस्यांच्या मनामध्ये एकमेकांविषयी प्रचंड राग खदखदतो आहे, असं बिग बॉस यांच्या प्रकर्षाने निदर्शनास आलं आहे.त्यामुळेच हा टास्क देत बिग बॉस घरातील सदस्यांना त्यांच्या मनातील राग व्यक्त करण्याची संधी देणार आहेत. गार्डन एरियामध्ये पंचिंग बॅग आणि बॉक्सिंग ग्लोव्हस आणि सर्व सदस्यांचे फोटोज ठेवण्यात येणार आहेत. त्या पंचिंग बॅगवर सदस्यांचे फोटोज लावून प्रत्येक सदस्याला आपल्या मनातील राग व्यक्त करायचा आहे आणि कटू भावनांना मोकळी वाट द्यायची आहे. परंतु, हा राग फक्त त्या बॅगला मारून नव्हे तर मनात साठलेल्या भावना आणि राग बोलून देखील दाखवायचा आहे.

या टास्कदरम्यान सर्व सदस्यांना तो राग व्यक्त करण्याची संधी बिग बॉस देणार आहेत. जुईला जेंव्हा संधी मिळाणार तेव्हा ती सई, मेघा आणि ऋतुजावर आपला राग व्यक्त करणार आहे.पुष्करने जुई, स्मिता, राजेश, रेशम, भूषण म्हणजेच त्यांच्या संपूर्ण ग्रुपवर राग व्यक्त करणार आहे. ज्यामध्ये त्याने या संपूर्ण ग्रुपमधील सदस्य स्वत:लाच बिग बॉस समजत आहेत असं सांगणार आहे.

मेघा देखील याच ग्रुपवर तिची नाराजी व्यक्त करताना दिसणार आहे. ज्यामध्ये ती रेशम आणि राजेश आपल्याला आवडत नाही असं म्हणणार असून यामधील कोणामध्येच मोठेपण नाही, सगळे ढोंगी आहेत आणि चांगलेपणाचं नाटक करतात असं ती म्हणणार आहे.

रेशम सई, जुई आणि उषा ताई यांच्यावर राग व्यक्त करणार असून सई आणि तिची स्पर्धाच नाही असं सांगणार आहे. तसंच मेघा आणि उषाताईंवह देखील बरीच नाराजगी व्यक्त करणार आहे.

ऋतुजा या टास्कमध्ये आपल्या मनामध्ये असलेला राग आणि बऱ्याच कटू भावना मोकळी करताना दिसणार आहे. तिने जुईला नुसता गोड चेहरा आहे, तर रेशम आणि भूषणबद्दल देखील राग व्यक्त केला. राजेश, सुशांत, स्मिता, भूषण, उषाजी यांच्या मनामध्ये काय आहे हे बुधवारच्या भागामध्ये प्रेक्षकांना कळेलच.हेही वाचा

राजेश पुन्हा करणार बीग बॉसच्या घरात एन्ट्री


संबंधित विषय
Advertisement