Advertisement

राजेश पुन्हा करणार बीग बॉसच्या घरात एन्ट्री


राजेश पुन्हा करणार बीग बॉसच्या घरात एन्ट्री
SHARES

बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य असलेला राजेश शृंगारपुरे गेले बरेच दिवस सिक्रेट रूममध्ये एकटा रहात होता. परंतु, रविवारी त्याला अश्रू अनावर झाले आणि त्यांनी बिग बॉसला विनंती केली की मला परत बिग बॉसच्या घरामध्ये जाऊ द्या. त्याची ही विनंती बिग बॉसने मान्य केल्याने आता तो पुन्हा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये परतणार आहे.
त्यामुळे रेशम, आस्ताद, सुशांत आणि जुई या सगळ्यांच खूप आनंद झाल्याचं दिसून येणार आहे.


राजेशचा अज्ञातवास संपला

रेशम आणि राजेश हे दोघीही मागील आठवड्यामध्ये डेंजर झोनमध्ये होते. रेशम टिपणीस घरामध्ये परतली पण, राजेश याला अज्ञात वासामध्ये ठेवण्यात आलं होतं. परंतु, घरच्यांसाठी मात्र तो एलिमनेट झालेला होता. सोमवारी राजेश याला बिग बॉस त्याचा अज्ञातवासाचा कालावधी संपला असं घोषित करून परत बिग बॉसच्या घरामध्ये पाठवणार आहेत. राजेशच्या येण्यानं आता घरातील सदस्यांमध्ये काय बदल बघायला मिळतील हे बघण्यासारखं असणार आहे.

राजेश घरी परतल्यावर, “मी फक्त तुझ्यासाठी या घरामध्ये आलो” असं राजेशने रेशमला बोलून दाखवलं आहे.

अनिल थत्ते यांनी कुणाला वाचवलं?

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून रविवारी अनिल थत्ते यांना घराबाहेर जावं लागलं. घराबाहेर पडल्यावर त्यांना एक विशेष अधिकार देण्यात आला ज्याद्वारे त्यांनी घरामधील एका सदस्याला घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमधून वाचवलं आहे. अनिल थत्ते यांनी भूषण कडूला वाचवले असून, आता घरामधील बाकीचे सदस्य कोणाला नॉमिनेट करणार? आणि कोण घराबाहेर पडणार? हे बघणे रंजक असणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा