Advertisement

बिग बॉसच्या घरात कोण ठरणार खुर्ची सम्राट?


बिग बॉसच्या घरात कोण ठरणार खुर्ची सम्राट?
SHARES
Advertisement

कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरात बुधवारी दिवसाची सुरुवात “सावधान सावधान वणवा पेट घेत आहे” या गाण्यावर होणार आहे. मंगळवारी बिग बॉसने दिलेल्या “खुर्ची सम्राट'' या खेळावरून घरामध्ये बरीच भांडण झाली. त्याप्रमाणे बुधावारी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये “खुर्ची सम्राट” हा खेळ रंगणार आहे. आणि या खेळातला विजेता कोण ठरणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.


पुढे काय?

आज टीम आस्ताद खुर्चीवर बसणार असून टीम रेशम त्यांना खुर्चीवरून उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे खेळत असताना टीम रेशम मंगळवारी त्यांच्यावर झालेल्या गोष्टींचा बदला घेणार की सयंमाने खेळणार ते लवकरच कळेल. यामध्ये टीम आस्तादला टीम रेशमपेक्षा जास्त कालावधीपर्यंत खुर्चीवर बसून रहाणे अनिवार्य असणार आहे. खेळाच्या शेवटपर्यंत टीम आस्तादमधील किमान एक तरी सदस्य त्या खुर्चीवर बसणे महत्त्वाचं असणार आहे आणि असे झाल्यास ती टीम विजयी ठरणार आहे.


आऊंनी मागितली माफी

मंगळवारी घरातील सदस्यांची नाराजगी बघता आऊ म्हणजेच उषा यांनी सगळ्यांची माफी मागितली. सई लोकुरला टीम रेशमची तिच्याप्रती असलेली वागणूक अजिबात आवडली नाही. या खेळानंतर घरामध्ये खरोखरच दोन ग्रुप पडलेले जाणवत आहेत, ते म्हणजे आस्ताद, रेशम, राजेश, भूषण, विनीत आणि सुशांत तर दुसरीकडे मेघा, उषाजी, पुष्कर, सई आणि ऋतुजा. आता विनीत आणि अनिल थत्ते नक्की कोणत्या गटात आहेत किंवा त्यांना कोणता गट आपलसं करेल हे येणारी वेळचं सांगेल.

बुधवारी बिग बॉस घरामध्ये खेळा दरम्यान काय होणार? कोण कोणावर हावी होणार? कोणता संघ विजयी ठरणार? घरातले वातावरण अजून बिघडेल की घरातील सदस्य सगळं सावरून घेतील? हे बघणे खरोखरच रंजक असणार आहे.

संबंधित विषय
Advertisement