Advertisement

मेघा-सईचं रेशमसोबत होणार भांडण!


मेघा-सईचं रेशमसोबत होणार भांडण!
SHARES

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामध्ये बिग बॉस यांनी सोपवलेलं ‘द ग्रेट डिक्टेटर’ हे कार्य सुरू होतं. यात नंदकिशोर हुकुमशाह आणि घरातील इतर सदस्य प्रजा आहे. परंतु, मेघाला बिग बॉसकडून मिळालेल्या आदेशानुसार प्रजेने काल हुकुमशहाविरोधात बंड पुकारलं. 

हुकुमशहाच्या किमान पाच पोस्टरवर काळा रंग फासणं, हुकुमशहा यांचा पुतळा नष्ट करणं, हुकुमशहा यांच्या डोक्यावर पाणी ओतणं, हुकुमशहा यांच्या विशेष रूममध्ये जाऊन स्मोक बॉम्ब फोडणं या बिग बॉस यांनी हुकुमशाही संपुष्टात आणण्यासाठी दिलेल्या कार्यामध्ये प्रजा यशस्वी ठरली आहे. त्यामुळेच ‘द ग्रेट डिक्टेटर’ या कार्यामध्ये प्रजा विजयी ठरली. आता बिग बॉसच्या घराचा नवा कॅप्टन कोण होणार? हे पाहायचं आहे.

बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्य जिंकण्यासाठी आले आहेत. आता थोडे दिवस राहिल्यामुळे घरातील प्रवास आणखी अवघड होत जाणार आहे. त्यासाठीच ध्येयाच्या आणखी जवळ नेण्यासाठी बिग बॉस कॅप्टनसीच्या उमेदवारांना ‘चाल-वाटचाल’ हे कॅप्टनसीचं कार्य आज सोपवणार आहेत. ज्यामध्ये रेशम, सई आणि नंदकिशोर हे उमेदवार असतील. या टास्कमध्ये मेघा आणि रेशम यांच्यात वाद होणार आहेत. तसंच सई आणि रेशममध्येही बरीच बाचाबाची बघायला मिळणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा