Advertisement

ठरलं...मराठी बिग बॉसच्या घरात पहिला प्रवेश उषा नाडकर्णींचा!

मनोरंजनाचा बॉस आता मराठीमध्ये येणार आणि त्यात उषा नाडकर्णी स्पर्धक म्हणून असणार म्हटल्यावर मराठी बिग बॉसमध्ये रंगत येणार हे नक्की. त्यात महेश मांजरेकर या शोला होस्ट करणार आहेत. त्य़ामुळे हा शो हिट होणार यात शंकाच नाही!

ठरलं...मराठी बिग बॉसच्या घरात पहिला प्रवेश उषा नाडकर्णींचा!
SHARES

बिग बॉस आता मराठीमध्ये येणार म्हटल्यावर प्रेक्षक भलतेच खूष आहेत. मराठी बिग बॉसमध्ये कोण कोण सेलेब्रेटी दिसणार? याबाबत सगळ्यांच्याच मनात उत्सुकता आहे. यामध्ये एक नाव पुढे आलं आहे, ते म्हणजे अभिनेत्री उषा नाडकर्णी.

मनोरंजनाचा बॉस आता मराठीमध्ये येणार आणि त्यात उषा नाडकर्णी स्पर्धक म्हणून असणार म्हटल्यावर मराठी बिग बॉसमध्ये रंगत येणार हे नक्की. त्यात महेश मांजरेकर या शोला होस्ट करणार आहेत. त्य़ामुळे हा शो हिट होणार यात शंकाच नाही!


या कालाकारांनी दिला नकार…

मराठी बिग बॉससाठी अभिनेता ललित प्रभाकर, प्राजक्ता माळी, प्रिया बापट, गौरी सावंत, श्रावणी सुर्वे या कलाकारांनी विचारण्यात आलं होतं. मात्र या कलाकारांनी हा शो करायला नकार दिला आहे.

अभिनेत्री उषा नाडकर्णी या अनेक मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. माहेरची साडी या चित्रपटातील खाष्ट सासूची त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यानंतर पवित्र रिश्ता या मालिकेतून त्या घराघरात पोहोचल्या. उषा नाडकर्णी यांचं विनोदी व्यक्तिमत्त्व नक्कीच मराठी बिग बॉसमध्ये रंंगत आणेल यात शंका नाही. शिवाय, त्यांच्या ऑन स्क्रिन खाष्ट स्वभावामुळे बिग बॉसच्या घरात काय काय घडतं, हे पहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


हेही वाचा

कसं असेल मराठी बिग बॉस? इथे पाहा फर्स्ट लूक!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा