Advertisement

‘बिग बॅास’मध्ये शर्मिष्ठा, मेघा झाल्या भावूक!

रविवारी सगळ्यांच्या लाडक्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी घराबाहेर पडल्या. यावरून शर्मिष्ठा खूपच भावूक झाली. “पुष्कर आणि सई आता माझ्यासोबत नाही, जे माझ्या खूप जवळचे मित्र होते. आऊ घराबाहेर गेल्यानंतर मलासुद्धा तितकंच वाईट वाटलं आहे”, असं म्हणत मेघा शर्मिष्ठाला सोमवारी आधार देण्याचा प्रयत्न करताना दिसेल.

‘बिग बॅास’मध्ये शर्मिष्ठा, मेघा झाल्या भावूक!
SHARES

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामधून रविवारी सगळ्यांच्या लाडक्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी घराबाहेर पडल्या. यावरून शर्मिष्ठा खूपच भावूक झाली. “पुष्कर आणि सई आता माझ्यासोबत नाही, जे माझ्या खूप जवळचे मित्र होते. आऊ घराबाहेर गेल्यानंतर मलासुद्धा तितकंच वाईट वाटलं आहे”, असं म्हणत मेघा शर्मिष्ठाला सोमवारी आधार देण्याचा प्रयत्न करताना दिसेल.


बिग बॉसमध्ये पुढे काय?

मेघाने सई, पुष्कर, शर्मिष्ठा यांना न सांगता आस्तादला दिलेल्या मतामुळे त्यांच्या मैत्रीत वादाची ठिणगी पडली. सई आणि पुष्करने तर आता मेघावर विश्वास ठेऊ शकत नाही, असं सांगितलं. रविवारी झालेल्या छोट्याशा खेळामध्येही जेव्हा खंजीर देण्याची वेळ आली, तेव्हा सई आणि बाकीच्या काही सदस्यांनी मेघाचंच नाव घेतलं. आता बिग बॉसच्या घरामध्ये बदललेली ही नाती नक्की पुढे कोणते बदल घरामध्ये आणतील हे पाहाणं रोमांचक ठरणार आहे.


पुढील टास्क काय?

सोमवारी बिग बॉस सगळ्यांना आगळावेगळा टास्क देणार आहेत. बिग बॉस यांच्या असं निदर्शनास येईल की, गेल्या अकरा आठवड्यात केलेल्या अथक परिश्रमांमुळे आता सदस्यांना थकवा आला आहे. म्हणूनच सदस्यांना झोपेची नितांत आवश्यकता भासत आहे. यासाठी बिग बॉसच्या घरातील एक महत्त्वाचा नियम आज शिथिल करण्यात येणार आहे. 

बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील सदस्यांना कुठेही आणि कधीही झोपण्यास परवानगी आहे. पण यामध्ये बिग बॉस एक अट सदस्यांना देणार आहेत. सर्व सदस्यांचा मिळून झोपेचा एकूण अवधी आठ तास असेल. आता बिग बॉसच्या घरातील सदस्य हा टास्क कसा पूर्ण करतील? कोणती आव्हानं त्यांच्यासमोर येतील? हे बघायला मिळेल.


हेही वाचा -

‘बिग बॉस’मध्ये पुढील कॅप्टनसीचं कार्य काय?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा