Advertisement

बिपाशा आणि करणमधली सिजलिंग केमिस्ट्री!


बिपाशा आणि करणमधली सिजलिंग केमिस्ट्री!
SHARES

बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात हॉट आणि सिजलिंग कपल आहे. यापूर्वी 'अलोन' या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं आहे. या चित्रपटात त्यांनी इंटिमेट सीन्सही दिले आहेत. आता 'अलोन' चित्रपटानंतर पुन्हा एकदा बिपाशा आणि करणचा हॉट अंदाज पाहायला मिळणार आहे. मात्र या वेळी कोणत्या चित्रपटात नाही, तर एका जाहिरातीत त्यांची सिजलिंग केमिस्ट्री पाहायला मिळतेय. कंडोमच्या एका जाहिरातीमुळे सध्या ते दोघे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.




या अॅडमधून बिपाशाचा हॉट अंदाज पुन्हा एकदा समोर आला आहे. कंडोमच्या जाहिरातीचा हा व्हिडिओ बिपाशा आणि करणनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.




Us❤️

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu) on


व्हीडिओ शेअर करत बिपाशानं कॅप्शन दिलं आहे की, 'आपला देश लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर येतो. अजूनही आपल्या देशात सेक्स आणि कंडोम या विषयांवर खुलेपणानं बोलणं टाळलं जातं. कंडोमच्या मदतीनं आपण कुटुंब नियोजन करू शकतो. आम्ही कंडोमचा वापर करतो. त्यामुळे ही जाहिरात करण्यात आम्हाला काहीही गैर वाटलं नाही.'



❤️ #monkeylove @playgardcondoms

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu) on


सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओला पसंती दिली आहे.



हेही वाचा

'पद्मावती'साठी वापरलं 400 किलो सोनं!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा