Advertisement

का आली अभिनेत्रीवर उधारी घेण्याची वेळ?


का आली अभिनेत्रीवर उधारी घेण्याची वेळ?
SHARES

वांद्रे - बॉलिवूडमधले कलाकार म्हटल्यावर डोळ्यांसमोर येतो तो त्यांचा भपका. भल्या मोठ्या कार, पॉश घरं आणि एकूणच आलिशान राहणीमान. पण एका टॉपच्या हिरॉइनवर अंडी घेण्यासाठी मित्राकडून उधारी करायला लागली, हे तुम्हाला खरं वाटेल का हो? पण असं खरंच घडलंय. ही हिरॉइन आहे बिपाशा बसू. या उधारीची माहिती तिनंच ट्विटरवर दिलीये. झालं असं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्वांचाच गोंधळ उडाला. सर्वांचेच सुट्ट्या पेैशावरून वांदे झाले. बिपाशाचीही तीच अडचण झाली. याची माहिती देणाऱ्या ट्विटमध्ये बिपाशा म्हणते की, "अंडी विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. आत्ताच अंडं घेण्यासाठी रॉकीकडून पैसे उधार घेतले. काय दिवस आलेत?"

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा