Advertisement

कोणत्या गोष्टीमुळे नाराज झाले धर्मेंद्र? वाचा


कोणत्या गोष्टीमुळे नाराज झाले धर्मेंद्र? वाचा
SHARES

एकेकाळी बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवणारे अभिनेता धर्मेंद्र सध्या एका गोष्टीमुळे खूपच नाराज झाले आहेत. शोले या सिनेमात अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी साकारलेली जय विरूची भूमिका आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. या दोघांच्या मैत्रीचे उदाहरण आजही दिले जाते.


का नाराज झाले धर्मेंद्र?

खरेतर शोले या सिनेमासाठी अमिताभ बच्चन यांचे नाव धर्मेंद्र यांनीच सूचित केले होते. पण अमिताभ बच्चन यांनी त्याचे क्रेडिट खूप उशिरा दिल्याने धर्मेद्र नाराज झाले आहेत. ते म्हणाले 'या सिनेमात जयच्या भूमिकेसाठी अमिताभ यांचे नाव मीच सूचित केले होते. पण मी याबद्दल कधीच काही बोललो नाही. अमिताभ यांनीच याबाबत सांगायला सुरुवात केली. खरेतर अमिताभ यांनी आपल्या कारकिर्दित शिखर गाठायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी हे स्वीकार केले होते की, धर्मेंद्रमुळेच आपल्याला या सिनेमात जयची भूमिका मिळाली. पण हे नंतर सांगून काय फायदा. कारण त्यावेळी त्यांचीच पब्लिसीटी होत होती. आता धर्मेंद्र कुणालाच आठवत नाही'.


शाळेत असतानापासूनच होती सिनेमा पाहण्याची आवड

धर्मेंद्र यांनी सन १९६० मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' या सिनेमातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दिला सुरुवात केली. शाळेत असतानापासूनच त्यांना सिनेमा पाहण्याची खूपच आवड होती. त्यांनी १९४९ मध्ये प्रदर्शित झालेला 'दिल्लगी' हा सिनेमा ४० वेळा पाहिला. धर्मेंद्र यांनी २०० हून अधिक सिनेमांत मुख्य भूमिका निभावली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा