Advertisement

बायोग्राफी लिहणाऱ्याला संजूबाबाने का पाठवली नोटीस?


बायोग्राफी लिहणाऱ्याला संजूबाबाने का पाठवली नोटीस?
SHARES

'संजय दत्त : द क्रेझी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलिवूड्स बॅॅड बॉय' या जीवनचरित्रामुळे संजय दत्तच्या खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला आहे. यामुळे संजूबाबा म्हणजेच संजय दत्त मात्र चांगलाच नाराज आहे.

संजय दत्तने या पुस्तकात छापण्यात आलेल्या गोष्टी आपल्या परवानगीशिवाय प्रकाशित करण्यात आल्याचे आरोप करत लेखक यासिर उस्मान याच्याविरोधात कायदेशीर नोटीस बजावली आहे.

 

याविषयी संजयने ट्वीट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. संजय म्हणतो, 'मी अाशा करतो की, यापुढे कोणत्याच गोष्टींचा संदर्भ घेतल्याशिवाय चर्चा करू नये. ज्यामुळे माझ्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जातील. माझं खरं जीवनचरित्र काही दिवसातच प्रकाशित करण्यात येईल. ज्यामध्ये माझ्या आयुष्यात घडलेल्या खऱ्या घटनांची माहिती देण्यात आली आहे. ’त्याचप्रमाणे दिग्दर्शक राजकुमार हिराणी लवकरच माझ्या आयुष्यावर चित्रपट घेऊन येत आहे.


ज्या प्रकाशकाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. त्या प्रकाशकालाही संजूबाबने नोटीस पाठवली आहे. या नोटीसला उत्तर देताना अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध असलेल्या संदर्भांमधूनच पुस्तकात माहिती घेण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे.

११९० मध्ये माझ्या मुलाखतींमधील ही माहिती आहे. त्यावेळी मासिकं आणि नियतकालिकांमधून देण्यात आलेली माहिती ही स्वरचित आहे. त्यात काहीही तथ्य नाही. असं संजय दत्तने ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण नेमंक कोणतं वळण घेतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा