व्वा! पठ्ठ्या महाराजांचा गड राखलास

‘तान्हाजी’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनावेळी चित्रपटातील काही कलाकारांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी घडलेल्या एका किस्स्यानं अभिनेता शरद केरकरचा सर्वांना अभिमान वाटला.

SHARE

तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटात तान्हाजी मालुसरे यांची भूमिका अभिनेता अजय देवगण साकारत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मराठमोळा अभिनेता शरद केळकर साकारणार आहे.तान्हाजी’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनावेळी चित्रपटातील काही कलाकारांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी घडलेल्या एका किस्स्यानं अभिनेता शरद केळकरचा सर्वांनाच अभिमान वाटावा.  

तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाला अजय देवगण, सैफ अली खान, शरद केळकर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत उपस्थित होते. यावेळी चित्रपटात शरद केळकर साकारत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल त्याला प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न विचारताना छत्रपती शिवाजी महाराजांचा 'शिवाजी' असा एकेरी उल्लेख करण्यात आला. शरद केळकरला खटकल्यानं त्यानं महिला पत्रकाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा उल्लेख करण्यास सांगितलं. यावरूनच शरदच्या मनात असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर कळून येतो. 

शरद केळकरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. ‘मराठी रिट्विट’नं त्यांच्या ट्विटर अकाऊंवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी ‘हे जपलं पाहिजे, वाढविले पाहिजे’, असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या कारनाम्यानंतर शरद केरकरचं सगळीकडे कौतुक होतंय.हेही वाचा

'तानाजी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, अजय-सैफ पुन्हा भिडणार

... म्हणून कपिल शर्मा शोमधून सिद्धू गेले, कपिलचा खुलासा


संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ