Advertisement

श्रेयस मराठी मालिकेत झळकणार!


श्रेयस मराठी मालिकेत झळकणार!
SHARES

तब्बल एक दशकाहून अधिक काळ मराठी सिरिअल्सपासून दूर राहिलेला अभिनेता श्रेयस तळपदे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. आणि त्याचे चाहते, याची आतुरतेनं वाट पहात आहेत. 'झी युवा'वर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'गुलमोहर' या मालिकेमध्ये श्रेयस दिसणार आहे!

येत्या २२ जानेवारीपासून 'गुलमोहर' सुरु होत आहे. प्रेम, भावना, नातेसंबंध यांवर आधारित विविध कथा या मालिकेमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. या मालिकेच्या पहिल्याच कथेत आपल्याला श्रेयसला पहाता येणार आहे. त्याच्यासोबत गिरीजा गोडबोले प्रमुख भूमिकेत दिसेल.



मैत्रीतील जीवाभावाचे सख्य, कॉलेजमधील मोरपंखी दिवस, प्रेमात पडल्यानंतरचा नवथरपणा, हॉस्टेल लाइफ असे आजच्या तरूणाईचे जवळचे विषय झी युवा वाहिनीने हाताळले आहेत. त्यामुळेच 'झी युवा'ने जेव्हा मला 'गुलमोहर'बद्दल विचारले, तेव्हा मी लगेच तयार झालो.

श्रेयस तळपदे, अभिनेता


फक्त श्रेयसच नाही, तर अनेक दिग्गज कलाकार या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे या मालिकेच्या माध्यमातून आपल्या आवडच्या कलाकारांना छोट्या पडद्यावर बघण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. दर सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९.३० वाजता ही मालिका प्रदर्शित होईल.



हेही वाचा

'न्यूड'ला सेन्सॉरचं 'ए' सर्टिफिकेट, प्रदर्शनाचा मार्ग मोकळा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा