ठाकूर अनुपसिंग मराठी चित्रपटात

 Mumbai
ठाकूर अनुपसिंग मराठी चित्रपटात
ठाकूर अनुपसिंग मराठी चित्रपटात
See all
Mumbai  -  

मुंबई - बॉलिवूडच्या अभिनेत्यांना मराठी चित्रपटात काम करायला आवडतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. ठाकूर अनुपसिंग या हिंदी सिनेसृष्टीतल्या अभिनेत्यालाही मराठी सिनेमांचा मोह आवरता आला नाही. दिग्दर्शक अनुप अशोक जगदाळे यांच्या 'बेभान' या सिनेमातून ठाकूर अनुपसिंग मराठीत दमदार पदार्पण करणार आहे.

२२व्या वर्षांपासून ठाकूर अनुपसिंगने फिल्मी करिअरला सुरुवात केली. बेभान या सिनेमातून ठाकूर अनुपसिंगचा रावडी लूक आपल्याला पाहायला मिळणार आहे. नुकतचं या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं. या पोस्टरवर ठाकूर अनुपसिंगचा रांगडा तसंच प्रेमात बेभान झालेला प्रियकर दिसतोय. प्रेमाचा रंंग लाल असल्यानं हे पोस्टरही लाल रंगाच्या बॅकग्राउंडवर बनवण्यात आलंय. मृण्मयी देशपांडे आणि ठाकूर अनुपसिंग या दोघांच्या प्रमुख भूमिका आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. मधुकर (अण्णा ) उद्धव देशपांडे यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून प्रसाद देशपांडे हे सहनिर्माते आहेत. दिनेश देशपांडे लिखित आणि शांभवी फिल्म्स निर्मित हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Loading Comments