Advertisement

अभिनेत्री रेखा आणि अमृता सुभाष यांना स्मिता पाटील पुरस्कार

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना शनिवारी ‘स्व. स्मिता पाटील स्मृती’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यांच्यासमवेत अभिनेत्री अमृता सुभाष यांना 'स्व. स्मिता पाटील कौतुक’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

अभिनेत्री रेखा आणि अमृता सुभाष यांना स्मिता पाटील पुरस्कार
SHARES

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना शनिवारी ‘स्व. स्मिता पाटील स्मृती’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यांच्यासमवेत अभिनेत्री अमृता सुभाष यांना 'स्व. स्मिता पाटील कौतुक’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी हा भव्य सोहळा पार पडला. हे दोन्ही पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार श्री. आनंदजी यांच्या हस्ते देण्यात आले.

रेखा यांनी यावेळी अमृता सुभाष यांच्याबरोबर ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला...’ हे गाजलेलं मराठी गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली. या वेळी रेखा यांनी पुरस्काराची ५० हजार रुपयांची रोख रक्कम स्मिता पाटील यांचे पुत्र प्रतिक बब्बर यांना भेट म्हणून दिली.  “आपण पुढे मागे जेव्हा एखादा चित्रपट काढू तेव्हा प्रतीकला त्यात नक्कीच काम देऊ,” असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. त्यांनी स्मिता पाटील यांच्याविषयीच्या आठवणीही यावेळी सांगितल्या.



या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर जीवनगाणी निर्मित ‘मूर्तिमंत अस्मिता - स्मिता पाटील नावाचा प्रवास’ ह्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सोनाली कर्णिक, अर्चना गोरे, सरिता राजेश आणि मंदार आपटे या गायकांनी गाणी सादर करून स्मिता पाटील यांच्या गतस्मृतींना उजाळा दिला.




हेही वाचा

अशीही एक स्मिता...!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा