'रेखा' नावाचा 'चित्रपट'!


SHARE

भानुरेखा गणेशन अर्थात रेखा यांचा आज ६३ वा वाढदिवस. सौंदर्य आणि कला यांचा अनोखा संगम म्हणजे रेखा. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर रेखांनी बॉलिवूडमध्ये यशाचे शिखर गाठले. आजही आपल्या सौंदर्यानं त्या अनेकांना घायाळ करतात. आपल्या सदाबहार अभिनयानं त्या आजही अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास रेखा यांच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. पण रेखा यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र एखाद्या चित्रपटाच्या कथानकापेक्षा वेगळं नाही!


सौजन्य


रेखाची आई अविवाहित होती

रेखा यांचे वडील जेमिनी गणेशन हे तमिळ अभिनेते होते आणि आई पुष्पावली तेलुगू अभिनेत्री होती. जेमिनी गणेशन यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये रेखाच्या आईनं काम केलं होतं. याच काळात दोघांचं प्रेमप्रकरण सुरू झालं. पण काही कारणास्तव दोघांनी लग्न केलं नाही. त्यानंतर रेखाचा जन्म झाला. पण जेमिनी यांनी रेखाला आपली मुलगी मानलं नाही. त्यामुळे रेखा यांच्या मनात कायम त्यांच्या वडिलांबद्दल तिरस्कार राहिला. याच रागात त्या त्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही गेल्या नाहीत असं सांगितलं जातं. काही वर्षांनी जेमिनी आणि पुष्पावल्ली यांनी लग्न केलं. लग्नानंतर त्यांना दुसरी मुलगी झाली.


सौजन्य


रेखाला पाच सावत्र बहिणी आणि एक सावत्र भाऊ 

जेमिनी गणेशन यांच्या आयुष्यात चार स्त्रिया होत्या. १९४० साली वयाच्या १९व्या वर्षी रेखाच्या वडिलांचं लग्न अला मेलूसोबत झालं. त्यानंतर त्यांचं अभिनेत्री पुष्पावल्ली म्हणजेच रेखाची आई, सावित्री आणि जुलियाना यांच्यासोबत अफेअर होतं. पहिली पत्नी अलामेलू यांच्यापासून जेमिनी यांना चार मुली झाल्या. रेवती, कमला, जयलक्ष्मी या तीन मुली डॉक्टर, तर नारायणी ही मुलगी पत्रकार आहे. पुष्पावल्ली यांच्यापासून जेमिनी यांना दोन मुली आहेत. एक रेखा आणि दुसरी राधा जी सध्या अमेरिकेत स्थायिक आहे. तर सावित्रीपासून जेमिनी यांना एक विजया नावाची मुलगी असून ती फिजिओथेरेपिस्ट आहे. तर मुलगा सतीश कुमार परदेशात राहतो


चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल

बेबी रेखा या नावानं रेखा यांनी प्रथम तेलुगू चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. १९६६ साली त्यांनी 'रंगूला रत्नम्' या तेलुगू सिनेमात बालकलाकाराची भूमिका केली. १९६९ साली 'अनजाना सफर' या चित्रपटाद्वारे रेखांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांना खरी ओळख १९७० साली मिळाली. 'सावन भादो' या चित्रपटामधून रेखा यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली.


सौजन्य


चित्रपटातील पहिल्या किस दरम्यान रेखाला अश्रू अनावर

१९६९ साली 'अनजान सफर' चित्रपटातील एका सीनमुळे रेखा यांना अश्रू अनावर झाले. मेहबूब स्टुडिओत राजा नवाथे यांच्या दिग्दर्शनात चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्यादिवशी रेखा आणि विश्वजीत यांच्यात एक रोमँटिक सीन शूट होणार होता. पण याबद्दल रेखा यांना काहीच माहिती नव्हती. राजा नवाथे यांनी अॅक्शन म्हणताच विश्वजीत यांनी रेखाला मिठीत घेतले आणि किस करायला सुरुवात केली. राजा नवाथे यांनी कट न बोलल्यामुळे विश्वजीत यांनी किस करणं थाबवलं नाही. रेखा यांना काय करावं हे सुचतच नव्हतं. अखेर त्यांना रडूच कोसळलं


रेखा यांच्या चित्रपटातील काही गाणी आजही प्रत्येकाच्या ओठी आहेत...


१) कुठं कुठं जायाचं हनिमुनला

१९८० साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट 'फटाकडी' यात रेखा या पहिल्यांदा मराठी गाण्यावर थिरकल्या होत्या. 'कुठं कुठं जायाचं हनिमुनला' या लावणीवर त्यांनी केलेलं नृत्य प्रचंड गाजलं.  २) कान में जुमका चाल में ठुमका३) तेरे बिना जिया जाए ना४) देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए५) इन आखो की मस्ती के मस्ताने हजारो है


६) कतरा कतरा मिलती हैकतरा कतरा जिने दो७) हमे और जिने की चाहत ना होती अगर...8) सुन सुन दीदी तेरे लिए एक रिश्ता आया है


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


संबंधित विषय