शमिताची सुपर कूल बीएमडब्ल्यू


SHARE

अभिनयापेक्षा नेहमीच इतर गोष्टींमुळे चर्चेत असलेली शिल्पा शेट्टी-कुंद्राची बहीण शमिता शेट्टी पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये आली आहे. शमिताने नुकतीच आपल्या आवडीची एक सुपर कूल कार खरेदी केली आहे.


बीएमडब्ल्यू ६३० ची खरेदी

‘मोहब्बतें’ या सिनेमाद्वारे हिंदी सिनेसृष्टीत दाखल झाल्यानंतर डझनभर हिंदी सिनेमांसोबत एखाद-दुसऱ्या तमिळ-कन्नड सिनेमातही अभिनय केला आहे. पण सिनेमे आणि अभिनयासाठी ती कधी फारशी चर्चेत राहिली नाही. शमिताने छोट्या पडद्यावरही आपलं नशीब आजमावलं. ‘बिग बॅास’ आणि ‘झलक दिखला जा’ या शोमध्ये आपला जलवा दाखवणाऱ्या शमिताने बीएमडब्ल्यू ६३० आय जीटी ही लक्झरी कार खरेदी केली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील बऱ्याच दिवसांपासून ही कार शमिताच्या मनात भरली होती. आपल्याकडेही अशी हाय-एंड स्पोर्ट्स कार असावी असं तिला सारखं वाटत होतं. अखेर तिची इच्छा पूर्ण झाली असून, ही कार आता तिच्या घरासमोर उभी आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या